आमच्याविषयी
मृद व जलसंधारण विभाग, अकोला
आमचे ध्येय
मृद व जलसंधारण विभाग, अकोला, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असून, मृद व जलसंधारणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्य करते. विभागाचे मुख्य उद्दिष्ट शाश्वत शेती विकास, जलसंधारण, मृदसंधारण आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधणे हे आहे.
इतिहास
महाराष्ट्र शासनाने ५ जून १९९२ रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली. या विभागाकडे जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट विकास, लघु सिंचन, पडीक जमीन विकास, जायुक्त शिवार योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटक २.० यासारख्या महत्वपूर्ण केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रमुख कामगिरी
- ५०,००० हेक्टरवर मृदसंधारणाचे कार्य
- १०,००० पेक्षा अधिक जलसंधारण संरचना उभारणी
- ५०० हून अधिक गावांमध्ये यशस्वी प्रकल्पांची अंमलबजावणी