महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015” पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून, आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरिष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपील करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.
मृद व जलसंधारण विभाग
शासन निर्णय मृद व जलसंधारण विभाग, क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.४९/जल-१७
दिनांक ३०/१०/२०१८
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५
क्र. | सेवेचे नाव | आवश्यक कागदपत्रे | शुल्क | कालावधी | पद निर्देशित अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय अधिकारी |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | पाणीवापर संस्थेस देय पाणी हक्क मंजूरी देणे | विहित नमुन्यातील अर्ज | निःशुल्क | 15 दिवस | सबंधित जलसंधारण अधिकारी | सबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला |
२ | पाणीवापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे | विहित नमुन्यातील अर्ज | निःशुल्क | 15 दिवस | सबंधित जलसंधारण अधिकारी | सबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला |
३ | बिगरसिंचन पाणी पट्टी थकबाकी दाखला देणे | विहित नमुन्यातील अर्ज | निःशुल्क | 15 दिवस | सबंधित जलसंधारण अधिकारी | सबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला |
४ | पाणी पट्टी देयक तक्रार निवारण करणे | विहित नमुन्यातील अर्ज | निःशुल्क | 15 दिवस | सबंधित जलसंधारण अधिकारी | सबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला |
५ | लाभ क्षेत्राचा दाखला देणे | विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा | निःशुल्क | 30 दिवस | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला | प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती | अपर आयुक्त जलसंधारण, नागपुर |
६ | ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत/कटक मंडळे यांना घरघुती पाणी वापर परवाना देणे | विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रे | निःशुल्क | 90 दिवस | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला | प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती | अपर आयुक्त जलसंधारण, नागपुर |
७ | महानगरपालिका, खासगी विकासक, विशेष नगर प्रकल्प यांना घरघुती/औद्यगिक पाणी वापर परवाना देणे | विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रे | निःशुल्क | 180 दिवस | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला | प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती | अपर आयुक्त जलसंधारण, नागपुर |
८ | औद्योगिक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे | विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रे | निःशुल्क | 180 दिवस | जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला | प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, अमरावती | अपर आयुक्त जलसंधारण, नागपुर |
अर्ज प्रक्रिया
सेवेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
- संबंधित सेवेसाठी अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक दस्तऐवज संलग्न करा
- संबंधित कार्यालयात सादर करा
- अर्ज मिळाल्याची पावती घ्या
- निर्धारित कालावधीत सेवा प्राप्त करा