भाषा:
अ- अ+

मृद व जलसंधारण विभागात ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित !!!

मृद व जलसंधारण विभागात ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित !!!
अकोला – मृद व जलसंधारण विभागीय कार्यालयात ई-ऑफिस प्रणालीसंबंधी दि २९/०७/२०२५ रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात कार्यालयीन कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने कसे करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षण श्री प्रमोद ठाकूर साहेब (DIT, Akola) यांनी दिले. प्रशिक्षणामध्ये विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर प्रशिक्षणामध्ये User Create करणे, Role Mapping करणे, e sign चे registration करणे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ई-ऑफिस प्रणालीचे फायदे, दस्तऐवज व्यवस्थापन, फाईल ट्रॅकिंग प्रणाली, तसेच डिजिटल सही इत्यादी बाबींचे प्रात्यक्षिकासह सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे शासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे, असे मत जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अकोला यांनी व्यक्त केले.

Comments

Leave a Comment

No comments yet. Be the first to comment!