अकोला जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाबाबत स्वातंत्र्यदिनी मा. पालकमंत्री, अकोला यांचे हस्ते पारितोषिक प्रदान.
महाराष्ट्र शासनाच्या “१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम” या उपक्रमात अकोला जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाने राज्यभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित मुख्य सोहळ्यात मा. श्री आकाश फुंडकर, पालकमंत्री अकोला यांच्या शुभहस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अकोला यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यालयीन कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवा यांना प्राधान्य देत मृद व जलसंधारण विभागाने दाखविलेल्या प्रयत्नांची राज्य शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीमुळे जिल्हा प्रशासनासह विभागीय अधिकारी व कर्मचारी वर्गात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Leave a Comment
No comments yet. Be the first to comment!