भाषा:
अ- अ+

अकोला जिल्ह्याचा राज्यात अभिमानास्पद मान : दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेत मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक !!!

अकोला जिल्ह्याचा राज्यात अभिमानास्पद मान : दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेत   मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक !!!
महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम या अभिनव उपक्रमात अकोला जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरात प्रथम क्रमांक पटकावून अकोला जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कार्यालयीन कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा करत या विभागाने कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशान्वये, राज्य शासनाने कार्यालयीन कामकाजात संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आणि कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर वाढवण्यासाठी राबवलेली ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात आली.मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाने राबवलेल्या प्रमुख उपक्रम:कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाची निर्मिती:मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजाची माहिती, सेवा, योजना, तक्रार निवारण व संपर्कसाठी https://swcdakola.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले. ही डिजिटल उपस्थिती नागरिकांशी थेट संपर्कात राहण्यासाठी महत्त्वाची ठरली. E-Office प्रणालीचा वापर (मृद व जलसंधारण विभागात राज्यात प्रथम): कार्यालयीन फाईल्स, नोंदी व दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी पारंपरिक कागदी प्रणालीऐवजी E-Office प्रणाली वापरण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. यामुळे फाईल मूव्हमेंटचा वेग वाढला असून त्यामध्ये पारदर्शकता आली आणि कागदाचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाला. महाराष्ट्र राज्यात मृद व जलसंधारण विभागात ही प्रणाली प्रथमच जिल्हास्तरावर अकोला येथे यशस्वीरित्या अंमलात आली. विभागांतर्गत सर्व अधिसूचित सेवा ऑनलाइन (मृद व जलसंधारण विभागात राज्यात प्रथम): लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सर्व ८ सेवा कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://swcdakola.in/services.php वर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये नकाशे, प्रमाणपत्र, परवानग्या, अहवाल इत्यादींचा समावेश आहे. ही सुविधा मृद व जलसंधारण विभागात महाराष्ट्रात प्रथमच लागू झाली आहे.AE-BAS (Attendance Monitoring System) (मृद व जलसंधारण विभागात राज्यात प्रथम): कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक Aadhaar Enabled Biometric Attendance System (AE-BAS) प्रणाली लागू करण्यात आली. यामुळे वेळेचे पालन, अनुशासन आणि उपस्थिती नोंद स्वयंचलित झाली. Digital Record Room Information System (मृद व जलसंधारण विभागात राज्यात प्रथम):जुने कागदोपत्री अभिलेख डिजिटल स्वरूपात स्कॅन व जतन करून डिजिटल रेकॉर्ड रूम सिस्टिम कार्यान्वित केली गेली. यामुळे दस्तऐवजांची झपाट्याने उपलब्धता, सुरक्षितता आणि शोधण्याची प्रक्रिया सुलभ झाली.उपसा सिंचन पाणी परवानगी प्रणाली ऑनलाइन (सुकर जीवनमान):तलावातून व को प बंधाऱ्यातून उपसा सिंचनासाठी लागणारी पाणी वापराची परवानगी ऑनलाइन मोडमध्ये आणून परवानगी प्रक्रिया जलद व पारदर्शक करण्यात आली. यामुळे वेळेची बचत होते.भूसंपादन प्रमाणपत्र ऑनलाइन (सुकर जीवनमान):प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनासंदर्भातील प्रमाणपत्र आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार धावपळ न करता सेवा मिळवता येते.कार्यालयीन स्वच्छता उपक्रम:कार्यालय परिसरात सातत्यपूर्ण स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिकमुक्त परिसर, हरित भिंती (green walls), झाडांची लागवड आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यामध्ये सुधारणा केल्या गेल्या.कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर:या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यासाठी MKCL मार्फत प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामुळे कामकाजाचे विश्लेषण, फाईल ट्रॅकिंग, दस्तऐवज व्यवस्थापन व कामकाजाचे पूर्वानुमान यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यात येत आहेत. यामुळे निर्णयप्रक्रियेत वेग व अचूकता आली आहे. वाटरशेड मॉडेलची निर्मिती: सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना गावपातळीवरील वाटरशेड संकल्पना समजण्यासाठी या कार्यालयात प्रत्यक्ष वाटरशेड मॉडेल तयार करण्यात आले. यामध्ये पाणलोटाच्या विविध उपचारांची माहिती तसेच पाणलोटाचे माथा ते पायथा हे तत्व समजण्यासाठी व जनजागृतीसाठी हे मॉडेल उपयोगी ठरले.अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार, (भाप्रसे) व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री. दिलीप निपाणे यांनी या यशाचे श्रेय मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याला दिले आहे. मृद व जलसंधारण विभाग, अकोला या कार्यालयाला मिळालेला हा सन्मान हे आमच्या संपूर्ण टीमच्या एकजुटीचे व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. ‘१०० दिवसांच्या विशेष मोहिमे’त आम्ही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हे यश केवळ सन्मान नाही, तर भविष्यातील जबाबदारीही आहे. आगामी काळातही आम्ही कार्यक्षम, पारदर्शक व जनतेच्या हिताचे कार्य अविरतपणे करत राहू. डॉ. अमोल दिलीप मस्कर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अकोला.

Comments

Leave a Comment

No comments yet. Be the first to comment!